SHRIMANT

Monday, March 2, 2026

सुरेश काका वडगावकर यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा दिमागदार वातावरणात संपन्न

कर्म,भक्ती व ज्ञान यांचा त्रिवेणी संगम - सुरेश धनराज वडगावकर यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा संपन्न
राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटविणारे अलंकापुरीचे माजी नगराध्यक्ष, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन संघाचे अध्यक्ष, सकल जैन संघ (पुणे जिल्हा) उपाध्यक्ष सुरेश (काका)वडगांवकर वयाच्या ८३ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. या मंगलमयी गोड क्षणांचे औचित्य साधून काकांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा रविवार, दि. १ मार्च २०२६ या शुभदिनी दिमाखदार वातावरणामध्ये संपन्न झाला. या पवित्र प्रसंगी श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी कृतज्ञताभाव व्यक्त करत भक्तिमय वातावरणात सामूहिक महापूजा, आरती व नामस्मरण करण्यात आले. उपस्थित मान्यवर, नातेवाईक व भाविकांनी सुरेशकाका यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व यशस्वी भविष्यासाठी प्रार्थना केली. नंतर काका यांचा सहस्त्रचंद्रदर्शन विधी त्यांच्या निवासस्थानी वेदघोष, मंत्रोच्चार आणि पारंपरिक विधींसह हा सोहळा अत्यंत मंगलमय वातावरणात पार पडला. तदनंतर त्यांच्या निवासस्थानापासून फ्रुटवाले धर्मशाळा येथपर्यंत बग्गीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. टाळ-मृदंगाच्या निनादात आणि “ज्ञानोबा-तुकाराम” जय महावीर -जय आनंदच्या जयघोषात मिरवणूक उत्साहात पार पडली. सजवलेल्या बग्गीत सुरेश वडगावकर यांचे मार्गावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी , औक्षण, सत्कार करून स्वागत करण्यात आले. या शोभायात्रेत नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ, जैन बांधव ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भक्तिमय वातावरणात पार पडलेली ही मिरवणूक सर्वांच्या स्मरणात राहणारी ठरली. दुपारी 12:30 वाजता वेदांताचार्य ह. भ. प. डॉ. नारायण महाराज जाधव व प.पू. जयस्मितजी म. सा. यांनी काकांच्या जीवनातील सात्त्विकता, कृतज्ञता आणि साधनेचे महत्त्व अधोरेखित करत काकांच्या दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी आशीर्वचन दिले. या सोहळ्याचे औचित्य साधून ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त ह. भ. प. भावार्थ देखणे, एम. आय. टी. पुणे चे मंगेश कराड, ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, पुणे जिल्ह्याचे सकल जैन संघाचे अध्यक्ष पोपटलालजी ओस्तवाल, कार्याध्यक्ष विलास राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाला. संत पूजनाच्या ह.भ.प. यशोधन म. साखरे, शंकर म. पांचाळ, बाळासाहेब म. शेवाळे, पंडित म. क्षीरसागर, अशोक म. पांचाळ, पंडित कल्याण गायकवाड, सोळंके महाराज, पंडित राधाकृष्ण महाराज, बाळासाहेब म. शेळके, रामभाऊ म. राऊत, नारायण म. जाधव, संतोषानंद म. शास्त्री, ह .भ. प.नरहरी चौधरी , ह भ प मुखेकर शास्त्री या महंत, कीर्तनकार यांच वडगावकर परिवाराच्यावतीने पूजन कार्यक्रम भक्तिभावाने पार पडला. विविध विषयांवरील शैक्षणिक, संस्कारक्षम व प्रेरणादायी पुस्तकांचे माध्यमातून काकांची ग्रंथ तुला करण्यात आली व हे ग्रंथ पुस्तके ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना भेट देण्यात आले. तद्नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष खेड आळंदी विधानसभेचे आमदार बाबाजी शेठ काळे व वडगाव शेरी विधानसभेचे आमदार बापूसाहेब पठारे, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, आळंदी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्र.विश्वस्त भावार्थ देखणे व विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे (कबीर बुवा), पुणे जिल्हा शिक्षण संस्था चालक महामंडळाचे अध्यक्ष विजय कोलते यांच्या प्रमुख उपस्थितीत व पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते काकांचा अभिष्टचिंतनाचा सोहळा संपन्न झाला.काकांचे औक्षण करण्यात आले. याप्रसंगी वरील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी नगरपालिका, श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन संघ, अखिल वारकरी गुरुकुल संघ, पत्रकार संघ आळंदी तसेच खेड पंचक्रोशीतील अनेक मित्रपरिवार, नातेवाईक, इतर संस्थांच्या माध्यमातून काकांना सन्मान चिन्ह व भेटवस्तू देत त्यांना सन्मानित केले. सर्व मान्यवरांनी काकांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवत दीर्घायुष्य करिता शुभेच्छा दिल्या. सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याचे औचित्य साधून दादासाहेब करांडे यांच्या संकल्पनेतून प्रदीप काळे व संजय कंठाळे यांच्या सहकार्यातून अवघ्या अडीच दिवसांत श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांच्या संयुक्त प्रयत्नातून हस्तलिखित ज्ञानेश्वरीचे उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६ - २७ पासून दरवर्षी १११ गरीब, हुशार व होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी रू.१०००/- अशी रू.१,११००० ची "सुरेश ध. वडगावकर ज्ञानदीप शिष्यवृत्ती" योजना जाहीर करण्यात आली. व एक लाख एक हजार रुपयांचा धनादेश प्राचार्य राठोड,मुख्याध्यापक प्रदीप काळे यांच्याकडे मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची शासकीय शिष्यवृत्ती न मिळणाऱ्या व आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक आर्थिक मदत देण्यात येणार आहे. काकांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने विद्यालयामध्ये रांगोळी, निबंध, वकृत्व, चित्रकला आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये जवळपास ६५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व रोख बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. काकांच्या जीवन प्रवासात प्रभाव असणाऱ्या वीज क्षेत्रातील व्यक्तिमत्व वासुदेव घुंडरे ,अशोक कांबळे ,रामदास भोसले, बजरंग ठाकूर जयवंत ठाकूर ,लालचंद नहार, नंदकुमार कुऱ्हाडे , डी डी. भोसले पा., नंदकुमार कुऱ्हाडे यांचा स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.दोन दिवसात हजारो विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरात साकारलेल्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजोपयोगी उपक्रम म्हणून पद्मश्री मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन नारायणगाव वतीने मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर मध्ये ४०० लोकांनी नेत्र तपासणी करून घेतली .पैकी २१ जणांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना पुढील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन रेड ब्लड बँकेच्या माध्यमातून करण्यात आले. या आरोग्य शिबिराचे उद्घाटन पिंपरी चिंचवड जिल्ह्याचे राष्ट्रीय संरक्षण स्वयंसेवक संघाचे कार्यवाही नरेंद्र पेंडसे, ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर व जैन साधू पंकज मुनी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याउपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. . ह. भ. प. जगन्नाथ महाराज पाटील, शिक्षणाधिकारी डॉ.भाऊसाहेब कारेकर, नगरसेवक सुरेशनाना झोंबाडे, कीर्तनकार अश्विनी इप्पर, आळंदीचे नगरसेवक रामदास भोसले, तुकाराम गवारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. या प्रसंगी ८३ मृदुंगांच्या निनादात हजारो वारकरी विद्यार्थ्यांच्या वतीने हरिपाठ झाला. ह. भ. प. जगन्नाथ म. पाटील यांचे किर्तन झाले.काकांचे जीवन हे श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष या माध्यमातून ज्ञान, आळंदी नगरपालिकेचे नगराध्यक्ष या माध्यमातून कर्म व जैन स्थानकाचे अध्यक्ष म्हणून भक्ती अशा ज्ञान योग ,कर्म योग, भक्ती योग या भगवद्गीतेतील तिन्ही योगांचे दर्शन घडविते. व त्याप्रमाणे ते ‌परिपूर्ण झाले असून त्यांच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता ही त्यांच्या कार्याची प्रचिती देत असल्याचे सांगितले. काकांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याच्या निमित्ताने आळंदी नगरपालिकेचे नगरसेवक पूजा घुंडरे, कांचन येळवंडे, साक्षी कुऱ्हाडे, आदित्य घुंडरे, ऋतुजा घुंडरे, सचिन गिलबिले, हेमंत कुऱ्हाडे, गोविंद कुऱ्हाडे, अरुणा घुंडरे, दिनेश घुले, सर्व पत्रकार, वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर, ग्रामस्थ, सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक यांनी उपस्थित राहून काकांना शुभेच्छा दिल्या. शेवटी महाराष्ट्र शासनाच्या ‘कंठ संगीत रत्न’ पुरस्काराने सन्मानित गायक व संगीतकार पंडित कल्याण गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी "माझ्या वडिलांची मिराशी गा देवा"या भावपूर्ण गायनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. आज सोहळा आमच्या वडगावकर कुटुंबासाठी अभिमानास्पद आणि अविस्मरणीय ठरले असल्याचे सांगत अजित वडगावकर यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष लहान थोरांपासून ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांसाठी दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

No comments: