SHRIMANT

Wednesday, March 25, 2026

इराण-अमेरिका युद्धामुळे काळ कठीण असणार आहे सर्वच गोष्टी जपून वापरा

युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही त्यामुळे दिवसेंदिवस परिस्थिती अधिक कठीण होईल असे दिसत आहे. कुणी कितीही वल्गना केल्या तरी पेट्रोल, गॅस चा तुटवडा जबरदस्त आहे व या तुटवड्याच्या झळा अजून अधिक तीव्र होऊ शकतात. त्यामुळे आपण आपल्या गरजा कमी करणेच जास्त हिताचे ठरेल !
1) सर्वात महत्त्वाचे आम्ही श्रीमंत आहोत , आम्हाला पैश्याची कमी नाही या भ्रमातून पटकन बाहेर पडा. 2) ज्यांच्याकडे जेमतेम आर्थिक उत्पन्न आहे त्यांनी तर विशेष काळजी घ्यावी. 3) घरगुती गॅसचा वापर कमी करा. भविष्यात गॅस मिळणे अजून जास्त कठीण होऊ शकते. 4) Induction coil चा थोडाफार वापर सुरू करावा. 5) एकवेळचे जेवण गॅसवर केलेल्या स्वयंपाकावर व दुसऱ्या वेळेस म्हणजे संध्याकाळी only fruits, मुरमुर्याचा चिवडा, भेळ खाऊन रहावे. (गॅस कमी लागावा म्हणून.) 6) विजेचा वापर सुद्धा जपून करा.विनाकारण लाईट, फॅन, गिझर जास्तवेळ चालू ठेऊ नका . 7) राईस आणि राईस product चा जास्त वापर करा. 8) फक्त एकावेळेसच जेवण करणे. हे करता आले तर फारच उत्तम. 9) असं जगायचं तर पैसेच कशाला कमवायचे ? असे उद्घट उत्तर देऊ नका. *अहो पैसे असून उपयोग नाही, बाजारात वस्तू मिळाल्या पाहिजेत !* 10) नवीन वस्तू घेणे, विनाकारण loan घेणे या गोष्टी टाळा. 11) अनावश्यक खरेदी करू नका. गरज नसलेल्या वस्तूंची भरमसाठ खरेदी करणे ताबडतोब थांबवा ! 12) काटकसर करणे या उत्तम गुणाला, *चिकट आहेत* असे म्हणून हिणवू नका. 13) विनाकारण मोठेपणा करणं, ऐपत नसतांना खर्च करणे , या गोष्टीपासून दूर रहा. 14) पैसे बचत करा, वेळेला तेच उपयोगी येणार आहेत. एकमेकांच्या सोबत रहा.एकत्र रहा. आपापसात शुल्लक गोष्टींवर भांडू नका. छोट्या छोट्या गोष्टी सामोपचाराने सोडवा. 15) घरामध्ये अन्न वाया घालवू नका. एकतर लागते तेवढेच करा, नसता शिळे खाण्याची तयारी ठेवा. अन्न शिजवताना नियोजन हवे. 16) परिस्थिती नसतांना सोने, चांदी खरेदी करण्याचा हा काळ नाही. 17) सर्वात महत्त्वाचे म्हणजे गाड्यांचा वापर कमी करा. इथून पुढे गॅस, पेट्रोल, डिझेल, रॉकेल या वस्तू महाग सुद्धा होऊ शकतात आणि त्याचा तुटवडा सुद्धा निर्माण होऊ शकतो . घरातील वीज जपून वापरा. अनावश्यक दिवे पंखे लगेच बंद करत जा. गीझर बटन लगेच बंद करत जा. लवकर इलेक्ट्रिक गाडी घ्या. विजेवर चालणारे इन्डक्शन कुकर शेगडी घ्या. ती फार महाग होणार आहे. वर्षभराचे गहू तांदूळ डाळी कडधान्य भरा. त्यांना उन्हात वाळवा. बोरीक पावडर. जंतूनाशक गोळ्या घालून भरा. 18) मी काही भविष्यकार नाही. एकंदरीत परिस्थिती काय आहे याच्या वरून व्यक्त केलेला हा अंदाज आहे. आपणांस भीती घालणे हा या पोस्टचा उद्देश नसून, सावध करण्याचा उद्देश आहे. 19) आपापसात, कुटुंबात भांडणे, वादविवाद, अबोला अशा गोष्टीपासून दूर रहा. एकमेकाला साथ द्या, सहारा द्या. विपरीत परिस्थिती मध्ये मनोबल टिकून रहाणे अत्यन्त गरजेचे आहे .*इराण-अमेरिका युद्धामुळे काळ कठीण असणार आहे सर्वच गोष्टी जपून वापरा !* युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही त्यामुळे दिवसेंदिवस परिस्थिती अधिक कठीण होईल असे दिसत आहे. कुणी कितीही वल्गना केल्या तरी पेट्रोल, गॅस चा तुटवडा जबरदस्त आहे व या तुटवड्याच्या झळा अजून अधिक तीव्र होऊ शकतात. त्यामुळे आपण आपल्या गरजा कमी करणेच जास्त हिताचे ठरेल !

No comments: