SHRIMANT
- श्री संत ज्ञानोबा तुकोबा विश्वभ्रमण दिंडी सोहळा दुबई २०२२
- श्री विश्वशांती जगद्गुरू सेवा संस्था
- सूत्रसंचालन
- "भाषण कला शिका "
- ऑनलाईन बँक खाते
- भाषणासाठी विषय निवडताना
- वक्तृत्व कला
- सर्वांगीण दृष्टी
- संवाद तंत्र
- करीअर
- होमी मिनिस्टर LIVE
- विदेश दौरे
- मी श्रीमंत आहे live show
- सूत्रसंचालनासाठी उपयुक्त चारोळ्या
- पुस्तके का वाचावीत
- सूत्रसंचालन
- मीडिया
- कामगार पुरस्कार सोहळा
- LIVE मुलाखत
- तिरुपती बालाजी दर्शन
- मराठी देशा
- विवेकानंदांची अतिशय महत्त्वाचे वाक्ये
- चांगले विचार
- ई- Paper वर्तमानपत्रे
- उपयोगी छोट्या कथा
- निवडक बोधकथांचा एक संग्रह
- फक्त विनोद - Only Jokes
- वक्तृत्व
- योगासने
- वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Youtube
- News Blog
Tuesday, April 14, 2026
श्री ज्ञानेश्वर विद्यालयात संयुक्त जयंती समारंभ उत्साहात संपन्न
आळंदी देवाची : श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित, श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्यु. कॉलेजमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, संत गाडगेबाबा आणि भगवान महावीर या महापुरुषांची संयुक्त जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी संस्थेचे सचिव अजित वडगांवकर, प्राचार्य किसन राठोड, मुख्याध्यापक प्रदीप काळे, पर्यवेक्षिका हेमांगी उपरे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
संस्थेचे सचिव अजित वडगांवकर यांनी आपल्या मनोगतातून महापुरुषांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, भगवान महावीर यांनी विश्वाला अहिंसेचा संदेश दिला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवलेल्या संविधानामुळे भारतातील लोक गुण्या-गोविंदाने राहत आहेत आणि भारत देश प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत असून ते संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक ठरत आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्त्री शिक्षणातील कार्यामुळे महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली झाली, तर राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी स्वच्छतेचा संदेश देत “देव माणसात आहे” ही शिकवण दिली. तसेच महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण करण्याचा संदेश यावेळी दिला.
या प्रसंगी हेमांगी उपरे व सूर्यकांत खुडे यांनीही आपले विचार मांडले. तसेच संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. योगेश मठपती यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment