SHRIMANT
- श्री संत ज्ञानोबा तुकोबा विश्वभ्रमण दिंडी सोहळा दुबई २०२२
- श्री विश्वशांती जगद्गुरू सेवा संस्था
- सूत्रसंचालन
- "भाषण कला शिका "
- ऑनलाईन बँक खाते
- भाषणासाठी विषय निवडताना
- वक्तृत्व कला
- सर्वांगीण दृष्टी
- संवाद तंत्र
- करीअर
- होमी मिनिस्टर LIVE
- विदेश दौरे
- मी श्रीमंत आहे live show
- सूत्रसंचालनासाठी उपयुक्त चारोळ्या
- पुस्तके का वाचावीत
- सूत्रसंचालन
- मीडिया
- कामगार पुरस्कार सोहळा
- LIVE मुलाखत
- तिरुपती बालाजी दर्शन
- मराठी देशा
- विवेकानंदांची अतिशय महत्त्वाचे वाक्ये
- चांगले विचार
- ई- Paper वर्तमानपत्रे
- उपयोगी छोट्या कथा
- निवडक बोधकथांचा एक संग्रह
- फक्त विनोद - Only Jokes
- वक्तृत्व
- योगासने
- वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Youtube
- News Blog
Friday, March 6, 2026
ज्ञानेश्वरी ग्रंथावर विधान प्रकरणी स्वामी गोविंददेवगिरी यांचा ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी तर्फे निषेध आळंदी मंदिरात आज्ञानेश्वरी ग्रंथावर विधान प्रकरणी स्वामी गोविंददेवगिरी यांचा ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी तर्फे निषेध लगेच सत्कार
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : आचार्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित ‘ज्ञानोबा ते तुकाराम’ या राष्ट्रीय परिषदेत केलेल्या विधानाचा श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी यांच्या वतीने तीव्र निषेध करीत निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत नामदेव महाराज, श्री संत एकनाथ महाराज आणि श्री संत तुकाराम यांच्या ग्रंथांमध्ये वाङ्मय हे ग्रंथ नाहीत, ते भाष्य व संकलन आहे, अशा आशयाचे विधान केल्याचा आरोप संस्थान कमिटीने केला आहे.
आळंदी संस्थान कमिटीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संत ज्ञानेश्वर महाराजांनी प्राकृत व मराठी भाषेत साकारलेला ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ अत्यंत सहज, सुंदर, रसाळ व अलंकारिक भाषेत लिहिलेला असून तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरेचा महत्त्वाचा आधार आहे. संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान सर्वसामान्यांना समजावे यासाठी ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथाची निर्मिती केली आहे.
ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या उपसंहारात संत ज्ञानेश्वरांनी स्वतः ग्रंथाचे महत्त्व अधोरेखित केले असून, माझा आत्माराम बोली, माणसांमध्ये मिसे | वर्णिला शांतेशी तो हा ग्रंथु || अशा ओवी द्वारे ग्रंथाचे स्वरूप स्पष्ट केले आहे. त्या मुळे संत ज्ञानेश्वरांच्या ग्रंथ रचने बाबत केलेले विधान अयोग्य असल्याचे संस्थानने निवेदनातून म्हटले आहे. तसेच, संस्कृत गीतेमागील प्राकृत मराठी शब्द वाचले तर मराठी शब्द हे गीतेच्या वाणीचा अर्थ उलगडतात, असे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी मध्ये नमूद केले आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ केवळ भाष्य नसून स्वतंत्र आणि प्रगल्भ ग्रंथ रचना असल्याचे ही संस्थानने स्पष्ट केले. स्वामी गोविंददेव गिरी यांनी केलेल्या विधानाशी संस्थान कमिटी असहमत असून त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदविण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या कार्याचा व संत परंपरेचा आदर राखून संबंधितांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे आणि संतांची क्षमा मागावी, अशी मागणीही संस्थानने केली आहे.
आळंदी देवस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, योगी निरंजननाथ गुरुशांतिनाथ, चैतन्य केशवराव लोंढे , अॅड. रोहिणी पवार, पुरुषोत्तम पाटील यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
आळंदी मंदिरात आचार्य गोविंददेवगिरी यांचा संस्थान तर्फे सत्कार
गोविंद गिरी महाराज प्रकरणा वरून वारकरी संप्रदायात संताप व्यक्त होत असतानाच देहूत विरोध झाला. तर आळंदी देवस्थानने सकाळी जाहीर निषेध करीत दुपारी आचार्य गोविंददेवगिरी यांचा संस्थान तर्फे स्वागत करीत श्रींचे गाभाऱ्यात श्रींची प्रतिमा भेट देऊन सत्कार केला. या दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त माउली मंदिरात होता. आचार्य गोविंददेव गिरी महाराज उर्फ आचार्य किशोरजी व्यास यांनी माउली मंदिरात श्रींचे दर्शन घेत मंदिर प्रदक्षिणा केली. दरम्यान सुवर्णपिंपळ प्रांगणाचे मागील बाजूला मंदिरातून बाहेर पडताना मंदिरात साष्टांग दंडवत घातले. श्रींचे मंदिराचे कळसाचे दर्शन घेत मंदिरात पत्रकारांशी संवाद न साधता गुपचूप मार्गस्थ झाले. या वेळी बघ्यांची खूप गर्दी झाली होती. वातावरण रोषमय असल्याने त्यांचे समवेतच्या पोलिसांनी तसेच आळंदी येथील पोलिसांनी त्यांना सुरक्षा देत पुढील प्रवासास मार्ग सुखकर करून दिला. ते आळंदी मंदिरात येऊन गेल्या नंतर अनेकांना माहिती मिळाली. अनेकांनी त्यांचे वक्तव्याचा जाहीर निषेध करून आपल्या भावना व्यक्त केल्या. सोशल मीडियावर अनेक महाराज मंडळी, जाणकार यांनी जाहीर निषेध केला. आळंदी देवस्थानने एकीकडे जाहीर निषेध तर लगेच दुपारी मंदिरात स्वागत सत्कार केला. यावर हि अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मुळात जाहीर निषेधाचे पत्र जाहीर करण्यास हि देवस्थानने विलंब लावला. या साठी अनेकांनी देवस्थान ला आठवण करून दिल्या नंतर जग आली.
संत ग्रंथ संपदा विषयी केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यांमुळे धार्मिक व सामाजिक वर्तुळात लोकांच्या भावना दुखावल्या. या वरून वारकरी संप्रदायात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. संत परंपरेचा अवमान झाल्याचा आरोप करत देहू येथे संत तुकाराम महाराज संस्थान कडून विरोध व्यक्त करण्यात आला, तर दुसरीकडे आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कडून त्यांचा सत्कार झाल्याने देवस्थान चर्चेत राहिले. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ग्रंथां विषयी केलेले वक्तव्य वारकरी संप्रदाया कडून जाहीर निषेध करण्यात आला. या वक्तव्यांमुळे वारकरी, संत-महंत आणि भाविक, भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या.
आळंदीत आचार्य श्रीगोविंददेवगिरी महाराज यांचा मंदिर समितीने सत्कार केल्याचे समोर आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केलेली.
संत श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शन घेऊन गोविंददेवगिरीजी महाराज यांनी व्यक्त केलेले शब्द ( संभाषण ) मागे घेत असल्याचे सांगत कोणाचे भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करत माफी मागत असल्याचे जाहीर केले. आळंदी चे पविञ्य जपण्यास वेळ येईल तेव्हा आम्ही निस्वार्थी सेवा करु हे गोविंददेवगिरीजी महाराज यांनी जाहीर केले. या मुळे वातावरण काहीसे निवळले. दरम्यान अनेक ठिकाणी वारकरी संप्रदाय मधील मान्यवरांनी निषेध व्यक्त केला.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment