SHRIMANT
- श्री संत ज्ञानोबा तुकोबा विश्वभ्रमण दिंडी सोहळा दुबई २०२२
- श्री विश्वशांती जगद्गुरू सेवा संस्था
- सूत्रसंचालन
- "भाषण कला शिका "
- ऑनलाईन बँक खाते
- भाषणासाठी विषय निवडताना
- वक्तृत्व कला
- सर्वांगीण दृष्टी
- संवाद तंत्र
- करीअर
- होमी मिनिस्टर LIVE
- विदेश दौरे
- मी श्रीमंत आहे live show
- सूत्रसंचालनासाठी उपयुक्त चारोळ्या
- पुस्तके का वाचावीत
- सूत्रसंचालन
- मीडिया
- कामगार पुरस्कार सोहळा
- LIVE मुलाखत
- तिरुपती बालाजी दर्शन
- मराठी देशा
- विवेकानंदांची अतिशय महत्त्वाचे वाक्ये
- चांगले विचार
- ई- Paper वर्तमानपत्रे
- उपयोगी छोट्या कथा
- निवडक बोधकथांचा एक संग्रह
- फक्त विनोद - Only Jokes
- वक्तृत्व
- योगासने
- वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Youtube
- News Blog
Monday, March 9, 2026
सुरेश वडगांवकर यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त हस्तलिखित ज्ञानेश्वरीचे भव्य प्रकाशन
आळंदी - माजी नगराध्यक्ष सुरेश वडगावकर यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याचे औचित्य साधून पत्रकार ह.भ.प.श्रीमंत दादासाहेब करांडे यांच्या संकल्पनेतून "नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी | एक तरी ओवी अनुभवावी || या उक्ती प्रमाणे एक अभिनव आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. अवघ्या अडीच दिवसांच्या अल्पावधीत दादासाहेब यांनी मांडलेली संकल्पना श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, शिक्षक संजय कंठाळे, विठ्ठलदास गुट्टे, गजानन राठोड यांनी विशेष असे नियोजन करत श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी तसेच ह. भ. प. संदीप लोहार, ह. भ. प. तुकाराम कुरकुटे यांच्या गुरुकुल मधील ६० विद्यार्थी यांनी एकत्रित परिश्रम घेत हस्तलिखित ज्ञानेश्वरी साकारली.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र ग्रंथाचे लेखन करताना विद्यार्थ्यांनी काळ - वेळ यांचे भान न ठेवता आनंदाने, भक्तिभावाने शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली १२० ज्ञानेश्वरी ग्रंथांच्या सहाय्याने ८२१ विद्यार्थ्यांनी प्रत्येकी कमीत कमी ११ ओव्यांचे लेखन करत उपक्रमाला अध्यात्मिक आणि शैक्षणिक उंची प्रदान केली. अत्यंत सुंदर अक्षररचना, आकर्षक सजावट आणि शिस्तबद्ध मांडणीमुळे हस्तलिखित ज्ञानेश्वरी सर्वांच्या कौतुकास पात्र ठरली. ज्या वयात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली त्या वयातील जवळजवळ हजार मुलांनी अडीच दिवसात संपूर्ण ज्ञानेश्वरी हस्तलिखित करणे हा एक आगळावेगळा विक्रमच असून हे निव्वळ माऊलींच्या कृपेने शक्य झाले आहे असे श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर म्हणाले.
सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याच्या मंगलमय वातावरणात पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, खेड आळंदी विधानसभेचे आमदार बाबाजी काळे, वडगाव शेरी विधानसभेचे आमदार बापूसाहेब पठारे, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे (कबीर बुवा), पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, पुणे जिल्हा शिक्षण संस्थाचालक मंडळाचे अध्यक्ष विजय कोलते, सुरेश वडगावकर, अजित वडगांवकर, डी. डी. भोसले, अशोक उमरगेकर, बाबुलाल घुंडरे, पत्रकार दादासाहेब कारंडे, मुख्याध्यापक प्रदीप काळे आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते या हस्तलिखित ज्ञानेश्वरीचे प्रकाशन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
याप्रसंगी गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी "सुरेशकाका वडगांवकर यांनी खूप पुण्य केले असल्यामुळे व माऊलींच्या कृपा आशीर्वादाने एका शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याकरिता अडीच दिवसाच्या अत्यंत अल्प कालावधीत ज्ञानेश्वरी ग्रंथाचे लेखन करणे ही इतिहासातील पहिलीच घटना असावी" अशा अलौकिक उपक्रमाचे कौतुक करत, हस्तलिखित ज्ञानेश्वरीचे प्रकाशन करण्याची संधी आम्हास प्राप्त झाली त्यामुळे आम्ही धन्य झालो. असे कौतुकास्पद उद्गार काढले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संत साहित्याबद्दल आदर, संस्कार आणि अभ्यासाची गोडी निर्माण झाली असून उपस्थित मान्यवरांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे मनापासून अभिनंदन केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment