SHRIMANT

Thursday, May 14, 2026

शिवकालीन युद्धकला व शिवसंस्कार उन्हाळी शिबीर सांगता समारंभ उत्साहात संपन्न

चऱ्होली mee24taas team नवजीवन स्पोर्ट्स फाउंडेशन, दिघी पुणे-१५ आयोजित शिवकालीन युद्धकला व शिवसंस्कार उन्हाळी शिबीराचा सांगता समारंभ दि. १३ मे २०२६ रोजी सनशाईन SS इंटरनॅशनल स्कूल,चऱ्होली येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
दि. ४ मे २०२६ ते दि. १३ मे २०२६ या कालावधीत चाललेल्या या १० दिवसीय शिबीरात खेळाडूंना शिवकालीन युद्धकला, मर्दानी खेळ आणि शिवसंस्कारांचे प्रशिक्षण देण्यात आले. या शिबीर मध्ये तीन दल बनवले तोरणादल, प्रतापगडदल, शिवनेरीदल असे गट तयार करून प्रत्येक दल चे सांगता शेवटी प्रात्यक्षिक करून घेतले.या शिबीर मध्ये महाराष्ट्र मधील प्रसिद्ध असे सह्याद्रीचे भुते ट्रेकर्स चे अध्यक्ष आणि दुर्गशतकवीर श्री राज दादा तपसे यांनी शिबीर मध्ये भाग घेऊन प्रशिक्षण घेतले. सांगता समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिबीर मधील सर्व खेळाडूंचे पालक उपस्थित होते. पालकांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष स्नेह आणि प्रोत्साहन लाभले. यावेळी शिबीराचे मार्गदर्शक श्री. उदयभाऊ गायकवाड , सनशाईन स्कूल, प्रशिक्षक सौ. दिपाली जयेश पाटील, आणि नवजीवन स्पोर्ट्स फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. शिबीरात प्रशिक्षण घेतलेल्या खेळाडूंनी शिवकालीन युद्धकलेचे प्रात्यक्षिक सादर केले. खेळाडूंनी दाखवलेली शिस्त, ताकद आणि कौशल्य पाहून उपस्थित पालक व रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, "शिवकालीन युद्धकला आणि संस्कार हे आपल्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. अशा शिबीरांमधून मुलांमध्ये शिस्त, आत्मविश्वास आणि देशाभिमान निर्माण होतो." पुढेही हा क्लास सुरु राहणार आहे असे कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी सर्व खेळाडूंना प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले. नवजीवन स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने प्रशिक्षक, पालक, सनशाईन स्कूल प्रशासन आणि उपस्थितांचे आभार मानण्यात आले.

No comments: