SHRIMANT
- श्री संत ज्ञानोबा तुकोबा विश्वभ्रमण दिंडी सोहळा दुबई २०२२
- श्री विश्वशांती जगद्गुरू सेवा संस्था
- सूत्रसंचालन
- "भाषण कला शिका "
- ऑनलाईन बँक खाते
- भाषणासाठी विषय निवडताना
- वक्तृत्व कला
- सर्वांगीण दृष्टी
- संवाद तंत्र
- करीअर
- होमी मिनिस्टर LIVE
- विदेश दौरे
- मी श्रीमंत आहे live show
- सूत्रसंचालनासाठी उपयुक्त चारोळ्या
- पुस्तके का वाचावीत
- सूत्रसंचालन
- मीडिया
- कामगार पुरस्कार सोहळा
- LIVE मुलाखत
- तिरुपती बालाजी दर्शन
- मराठी देशा
- विवेकानंदांची अतिशय महत्त्वाचे वाक्ये
- चांगले विचार
- ई- Paper वर्तमानपत्रे
- उपयोगी छोट्या कथा
- निवडक बोधकथांचा एक संग्रह
- फक्त विनोद - Only Jokes
- वक्तृत्व
- योगासने
- वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Youtube
- News Blog
Sunday, December 15, 2024
मरकळ पंचलिंगमाळावर दत्तजन्मोत्सव हरिनाम गजरात
मरकळ पंचलिंगमाळावर दत्तजन्मोत्सव हरिनाम गजरात
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) :
श्रीक्षेत्र मरकळ ( मारूतीनगर ता.खेड ) येथील जागृत, पुरातन पंचलिंगमाळावरील दत्तमंदिरात टाळ-मृदंगाच्या गजरात श्री दत्त जन्मोत्सवा निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात विश्वकर्मा महाराज पांचाळ यांचे जन्मोत्सव कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रमांनी हरिनाम गजरात श्री पंचलिंग गुरुदेव दत्त देवस्थान ट्रस्ट अध्यक्षा ह.भ.प. ताईमाऊली महाराज यांचे मार्गदर्शनात श्री दत्त जन्मोत्सव सोहळा झाला. यावेळी परिसरातील भाविक, नागरिक यांनी श्रींचे दर्शनास मोठी गर्दी केली.दर्शन, महाप्रसाद मोठ्या उत्साहात वाटप करण्यात आला. या निमित्त पंचक्रोशीतील भाविक, नागरिकांना हरिकीर्तन सेवेच्या श्रवणाची पर्वणी लाभली.
पंचलिंग गुरुदेव दत्त प्रतिष्ठानच्या वतीने हरिनाम सप्ताहाचे आयोजन जन्मोत्सव सोहळा म्हणून करण्यात आले. या सप्ताहात विविध उपक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात असेल. नी या प्रसंगी पंचलिंग देवस्थान अध्यक्ष ताई माऊली महाराज, मी सेवेकरी फाउंडेशन अध्यक्ष सुधीर मुंगसे, पुणे जिल्हा वारकरी महामंडळाचे अध्यक्ष विलास महाराज बालवडकर, मराठी पत्रकार परिषद पुणे विभागीय सचिव गणेश मोकाशी, संचालक संतोष कुंभार, मरकळ उपसरपंच सतीश लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य भानुदास लोखंडे, विद्यमान सरपंच बाजीराव लोखंडे, विद्यमान चेअरमन बाळू टाकळकर, गोरक्ष महाराज वर्पे, माजी पंचायत समिती सदस्य तुकाराम वहिले, देवस्थान सदस्य संभाजी ज्ञानोबा लोखंडे, किरणशेठ लोखंडे, संतोष कुंभार, हिरामण लोखंडे, मयुर चव्हाण, सतिश लोखंडे, भानुदास लोखंडे, शंकर वरपे, हनुमंत आव्हाळे, पंडित बिराजदार, हनुमंत आदलकार, पुजारी स्वामी सूर्यवंशी, लक्ष्मण नेटके, कैलास होले, शिवाजी शंकर मोशेरे, आळंदी शहर शिवसेना शाखा प्रमुख रोहिदास कदम, तंटामुक्त समिती अध्यक्ष किरणशेठ लोखंडे, मोई ग्रामपंचायत सरपंच चंदनशेठ मुऱ्हे आदी उपस्थित होते. या सोहळ्यात श्री गुरु चरित्र पारायण, जप, यज्ञ, हरिनाम, पुष्प सजावट, दीपोत्सव, मंदिरास लक्षवेधी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सोहळ्याचे ग्रंथ पूजन पुणे जिल्हा वारकरी महामंडळाचे अध्यक्ष विलास महाराज बालवाडकर यांचे हस्ते झाले.
श्री पंचलिंग गुरुदेव दत्त देवस्थान ट्रस्ट , श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था अनाथ आश्रम मरकळ यांचे वतीने दत्तजयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविक नागरिक, वारकरी यांनी या जन्मोत्सवास उपस्थित होते. येत महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती. काल्याचे कीर्तन सेवा गोरक्ष महाराज वर्पे यांची होत असल्याचे ताई माउली महाराज यांनी सांगितलें.
श्री दत्तजन्मोत्सव सोहळ्यासाठी पुणे, रायगड, कोकण, मुंबई येथील दत्तभक्त, भाविक मरकळच्या दत्तमंदिरात दर्शनास मोठ्या संख्येने आले होते. मंदिर परिसरात या निमित्त लक्षवेधी भगव्या पताका, भगवे ध्वज, आकर्षक विद्युत रोषणाई, विविध रंगीबेरंगी आकर्षक पुष्प सजावट करण्यात आली होती. विविध फुलांची सजावट केल्यामुळे मंदिरे लक्षवेधी दिसत होते. वारकरी भजन, दत्तभजन यांच्या सुमधुर आवाजाने मंदिरासह परिसर धार्मिक भक्तिमय वातावरणात दुमदुमला. हरी ओम तत्सत्, जय गुरुदत्त दत्त या मंत्राचा अखंड जप झंझाळ. ज्ञानेश्वरी व गुरुचरित्र पारायणाचे वाचन, अखंड हरिनाम सप्ताहात भक्तिमय वातावरणात झाले. दिपप्रज्ज्वलन, वीणा पुजन, गुरुचरित्र आणि ग्रंथ पूजन, प्रतिमा पूजन, श्रीनां अभिषेक, पूजा, आरती असे भरगच्च धार्मिक कार्यक्रम झाले. अखंड हरिनाम सप्ताहात दररोज काकडा आरती, नित्य आरती, पारायण, होमहवन, भजन सेवा, हरिपाठ, आरती, किर्तन, अन्नदान, हरिजागर आदी धार्मिक कार्यक्रम परंपरेने झाले. यासाठी ताई माउली महाराज यांनी नियोजन केले. आळंदी, मरकळ व परिसरातील नागरिक, भाविकांना मोठ्या मंगलमय धार्मिक वातावरणात अन्नदान महाप्रसाद तसेच श्रींचा जन्मोत्सव साजरा केला. यासाठी मरकल ग्रामस्थ, संयोजन समिती, श्री पंचलिंग गुरुदेव दत्त देवस्थान ट्रस्ट आणि राम श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था अनाथ आश्रम मरकळ यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी गजानन महाराज सोमटकर, काळूराम महाराज घेनंद, बाळा हरगुडे, निरवळ महाराज, चाफेकर महाराज, सुधाकर पठाडे महाराज यांनी गायन साथ दिली मुरलीधर दादा गावडे, सारंग महाराज यांनी मृदंग साथ दिली. अंबादास बेंद्रे कार्तिकी शिंदे रमेश बेंद्रे पप्पू वाजे अक्षय भुसे यांनी तबला साथ दिली. काळूराम महाराज घेनंद यांनी भजन व किर्तन या बाबत नेतृत्व केले. शिवाजी महाराज पवार, राघोजी वाबळे यांनी हार्मोनियम साथ दिली. ज्ञानेश्वर नाणेकर यांनी विणेकरी म्हणून कामकाज पाहिले.
जन्मोत्सव सोहळ्यात ज्ञानेश्वरी भजनी मंडळ, तुळापूर भजनी मंडळ, जोगेश्वरी महिला भजनी मंडळ, साई दत्त भजनी मंडळ, भजनी मंडळ केळगाव, ग्रामस्थ भजनी मंडळ, चिंबळी ग्रामस्थ भजनी मंडळ, वडगाव काकडे भजनी मंडळ, भैरवनाथ ग्रामस्थ भजनी मंडळ यांनी जन्मोत्सव काळात संगीत भजन सेवा रुजू केली. श्री गुरुदेव दत्त जन्मोत्सवा निमित्त आळंदी पंचक्रोशीतील विविध मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांनी दत्त जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment