SHRIMANT

Sunday, December 29, 2024

बेशिस्त वाहनांमुळे नागरिक त्रस्त,वाहतूक कोंडीवर इलाज वाहतूक पोलीस गाड्यात जप्त करत लावत आहेत जामर

प्रतिनिधी आरिफ भाई शेख आळंदी येथे नेहमीची वाहतूक कोंडी झाली आहे.त्याचबरोबर बेशिस्त वाहनचालक,त्यांची अरेरावी,.याचाही प्रत्यय आळंदीत येत असतो.मुळात चुकीच्या ठिकाणी वाहने लावून लोकांना त्रास,त्यात उर्मटपणाचे वागणे,यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
मंदिराकडे जाणाऱ्या आतील रस्त्यावरील सर्रास वाहने लावले तासंतास विना पार्किंग झोन मध्ये लावली जातात त्यामुळे वाहतूक कोंडी होते पाळी येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होतो शालेय विद्यार्थी यामुळे अडचणीतून जाने येने करतात.या ठिकाणी नो पार्किंग बोर्ड आहे तरीही वाहने उभी करून निघून जाणाऱ्यांना आता चपराक बसणार आहे, दिघी आळंदी वाहतूक पोलीस यांनी टोइंग वाहने आणून गाड्या जप्त करायला सुरुवात केली आहे. प्रसंगी जामर लावून,जागेवर दंड नो पार्किंगला भरावा लागत आहे. यामुळे चुकीच्या ठिकाणी वाहने लावणाऱ्यांना शिस्त लागेल यासाठी सदर कारवाई आहे. आळंदीत दर्शनाची गर्दी नित्यनेमाची असते, भाविक येतात मात्र वेळीअवेळी लागणाऱ्या लग्नांमुळे आळंदीच्या वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यात लग्नाला येणारे सर्रास दर्शनाला जातात असे नाही. लग्न झाले की दर्शन न घेता निघून जाणारे काही महाभाग आहेत. मात्र त्यांच्या चुकीच्या लागलेल्या वाहनांमुळे स्थानिक लोकं त्रस्त झालेले आहेत. लग्नाच्या निमित्त सांगून लावू नको अशा ठिकाणी गाडी लावून जातात. आणि पोलिसांना निमंत्रित करा असा आदेशही देतात,असे महाभाग आपल्या चुकीच्या वागण्याने लोकांना त्रास होतो, याच भान ठेवत नाही. त्यावरच उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात जामर लावण्याची कारवाई चालू आहे. आळंदीत एकादशीलाही लोक लग्न लावतात ही खेदाची बाब म्हणावी लागेल. मात्र दिघी आळंदी पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. आळंदीकर नागरिकांनी त्याबाबत समाधान व्यक्त केले असून रोज होणारी कारवाई योग्य असेल असाही सूर निघत आहे. त्याचबरोबर दिघी आळंदी पोलीस स्टेशन यांनी रोज कारवाई करून,जादाकुमक जामर आणि टोइंग वाहन यांची मागणी करून घ्यावी आणि बेशिस्त वाहनचालकांना धडा शिकवावा अशी मागणी होत आहे.

No comments: