SHRIMANT

Thursday, February 20, 2025

अलंकापुरीत ज्ञानेश्वर विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा

डिजिटल मिडिया प्रमुख श्रीमंत दादासाहेब आळंदी
46 वर्षांपूर्वी दहावीत एकत्र शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा पुन्हा एकदा वर्ग भरला.आयुष्याचा हीरक महोत्सव पार केलेल्या विद्यार्थ्यांनी बाकावरच्या मित्र-मैत्रिणी सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयात 1977-78 मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन बुधवार ता.19 फेब्रुवारी 2025 रोजी संपन्न झाले. सर्व विद्यार्थी सहकुटुंब हजर होते तसेच हया" मैत्रेय ग्रुप "मध्ये समाजातील वेगळ्या स्तरावर काम करणारे जवळजवळ 65 जण आहेत. अनेक जण आहेत व हा ग्रुप अनेक वर्षा पासून कार्यरत आहे व प्रसंगात एकत्र येत समाजाच्या सुखदुःखात काम करत असतो.या मेळावा कार्यक्रम आयोजनात श्रीधर पाटील,आनंदराव मुंगसे,बाळासाहेब वडगावकर ,वासुदेव गोडे, ज्ञानेश्वर जाधव, रमेश जाधव इ. नी विशेष परिश्रम केले. कार्यक्रमास संस्थेचे सचिव श्री अजित वडगावकर ,विश्वस्त एल.जी. घुंडरे ,प्रकाश काळे ,प्राचार्य एस.जी.मुंगसे, मुख्याध्यापक प्रदीप काळे ऊपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात सर्व विद्यार्थी व त्यांचे कुटुंबीय यांना फेटे बांधून, रांगोळ्या काढून ,फलक लेखन व गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.तब्बल 46 वर्षांनी पुन्हा शाळेची घंटा वाजवून राष्ट्रगीत, राज्यगीत व पसायदान घेण्यात आले आणि त्यानंतर वर्गशिक्षक असणाऱ्या सुलभा पारेख मॅडमचा मराठीचा तास घेण्यात आला. शिक्षक व विद्यार्थ्यांचे खडू फळाच्या पलीकडे असणार माया ,प्रेम, जिव्हाळ्याचं नातं जपण्यासाठी त्यांच्या कालावधीत यशवंत गणपती सोनवणे सर, श्री जयसिंग काळे सर, श्री एल.जी.घुंडरे सर, कुलकर्णी मॅडम यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.शिक्षकांप्रती असलेली व जपलेली आदराची भावना प्रत्येकानेच आपल्या मनोगतातून व्यक्त केली. काही विद्यार्थ्यांनी आपल्या यशस्वी काराकीर्दीबद्दल माहिती देत नवीन पिढीला मार्गदर्शन केले. शिक्षकांनी आपल्या भाषणात जुन्या आठवणींना उजाळा दिलाच पण विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा ही गौरव केला. संस्थेचा वाढलेला सर्वांगीण विकास पाहून विद्यार्थ्यांनी संस्थापदाधिकाऱ्यांचे व प्राचार्य शिक्षक -,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक केले . त्यांनी संस्थेच्या भव्य शालेय इमारती ,इमारतवरील सुविचार ,महापुरुषांचे -संतांचे चित्र, सांस्कृतिक हॉल ,कला दालन ,गणित प्रयोगशाळा, संगणक व तंत्रज्ञान कक्ष, ग्रंथालय, शिक्षक-शिक्षिका विश्रामगृह, माऊली बाग, बालोद्यान, शालेय परिसराला भेट दिली. संस्थेची माहिती देणारी चित्रफीत त्यांना दाखवण्यात आली. विद्यालयाची झालेली ही प्रगती पाहून ते सर्वजण भारावून गेले. माजी विद्यार्थी म्हणून या सर्व विद्यार्थ्यांनी सामाजिक व शालेय बांधिलकी म्हणून संस्थेस 70 खुर्च्यांची भेट दिली. याप्रसंगी आभार व्यक्त करत असताना संस्था सचिव अजित वडगावकर यांनी आपण आपलं हा" मैत्रेय ग्रुपचा" स्नेह मेळावा या संस्थेत आयोजित करून आम्हाला आपले स्वागत करण्याची संधी दिली व विद्यालयास 70 खुर्च्या भेट दिल्या ,पुढेही सर्व स्तरावर सहकार्य करण्याची ग्वाही दिल्याबद्दल या बॅचचे आभार मानले. या प्रसंगी विविध प्रकारचे खेळ ,गाण्यांच्या भेंड्या, नकला तसेच जुन्या आठवणींना उजाळा दिला .सर्वजण शाळेतील गमती -जमती सांगत जुन्या आठवणीत रमले होते. स्नेहभोजनाच्या कार्यक्रमानंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. शालेय स्तरावतील ज्येष्ठ लिपिका संगीता पाटील, कर्मचारी राजू सोनवणे, भंगाळे दिनेश , सावळाराम देशमुख इ.नी मेळावा यशस्वी करण्यात मदत केली.

1 comment:

भाषण कला व संभाषण कला said...

सुंदरुउपक्रम आहे हा