SHRIMANT

Wednesday, October 1, 2025

आजोबांच्या ९७ व्या वाढदिवसानिमित्त नातवाचा उपक्रम

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सायकलद्वारे दिला जाणार शिक्षण प्रवासाला वेग आळंदी : ह.भ.प. धोंडीबा बाळाची आल्हाट यांच्या ९७ व्या वाढदिवसानिमित्त नातू तुषार आल्हाट यांनी एक आगळावेगळा उपक्रम राबवला आहे. ग्रामीण भागातील मुलांना रोज ३ ते ५ किलोमीटर पायी चालत शाळेत जावे लागते. डोळ्यांत मोठी स्वप्नं असली तरी थकलेल्या पायांमुळे त्यांचा शैक्षणिक प्रवास कठीण होत असतो. या प्रवासाला गती मिळावी आणि मुलांच्या शिक्षणाला बळ मिळावे या उद्देशाने तुषार आल्हाट यांनी ‘सायकल दान उपक्रम’ सुरू केला आहे.
या उपक्रमाअंतर्गत आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून जुन्या सायकली जमा केल्या जाणार असून, त्या RKH Group तर्फे नीट सर्व्हिस करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या जातील. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना शाळेत वेळेत पोहोचणे सोपे होणार आहे. “आजोबांचा ९७ वा वाढदिवस केवळ उत्सव म्हणून न साजरा करता, समाजातील मुलांच्या शिक्षणाला हातभार लावणाऱ्या उपक्रमाद्वारे तो अर्थपूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे तुषार आल्हाट यांनी सांगितले. या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास सुलभ होईल. त्यांच्या डोळ्यांतली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी ही सायकल छोटीशी पण मोठा बदल घडवणारी ठरणार आहे.

No comments: