SHRIMANT

Sunday, October 5, 2025

श्री ज्ञानेश्वर विद्यालय उपक्रमशील शाळा पुरस्काराने सन्मानित

पुणे आळंदी मी24तास टीम महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने पुण्यातील महात्मा फुले सांस्कृतिक सभागृहामध्ये शिक्षक आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या हस्ते विद्यालयास उपक्रमशील शाळा पुरस्काराने तर विद्यालयातील उपशिक्षिका उज्वला कडलासकर यांना शिक्षक सेना गुरु सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सर्व सुख सुविधांनी युक्त देखणी इमारत, कलादालन, क्रीडा दालन, गणित, विज्ञान, संगणक प्रयोगशाळा ,भव्य क्रीडांगण, माऊली बाग इ. भौतिक सुविधांबरोबरच ओळख श्री ज्ञानेश्वरीची, विद्यार्थी घडताना, कलाकार घडताना, दहावी, बारावी ज्यादा तास, स्कॉलरशिप, एन. एम. एम. एस, ओलंपियाड, विविध विषयांच्या प्रज्ञाशोध परीक्षा यांना विनामूल्य मार्गदर्शन, मासिक चाचणी, असाइनमेंट, आकर्षक वर्ग सजावट, विद्यार्थी अपघात फंड, आनंददायी शनिवारच्या माध्यमातून कृतीयुक्त अध्यापन असे अनेकविध उपक्रम विद्यालयात राबविले जातात. क्रीडा, सांस्कृतिक विविध स्पर्धा परीक्षांमध्ये तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर विद्यार्थ्यांनी केलेल्या नेत्र दीपक यशाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने विद्यालयास उपक्रमशील शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान संस्थेचे सचिव अजित वडगावकर, प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, नारायण पिंगळे, उज्वला कडलासकर, सोनाली आवारी यांनी स्विकारला. हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर आणि सचिव अजित वडगावकर व सर्व संस्था पदाधिकारी यांनी प्रशासन, सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी - विद्यार्थिनी आणि पालकांचे अभिनंदन केले. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने पुण्यातील महात्मा फुले सांस्कृतिक सभागृहामध्ये शिक्षक आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या हस्ते विद्यालयास उपक्रमशील शाळा पुरस्काराने तर विद्यालयातील उपशिक्षिका उज्वला कडलासकर यांना शिक्षक सेना गुरु सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सर्व सुख सुविधांनी युक्त देखणी इमारत, कलादालन, क्रीडा दालन, गणित, विज्ञान, संगणक प्रयोगशाळा ,भव्य क्रीडांगण, माऊली बाग इ. भौतिक सुविधांबरोबरच ओळख श्री ज्ञानेश्वरीची, विद्यार्थी घडताना, कलाकार घडताना, दहावी, बारावी ज्यादा तास, स्कॉलरशिप, एन. एम. एम. एस, ओलंपियाड, विविध विषयांच्या प्रज्ञाशोध परीक्षा यांना विनामूल्य मार्गदर्शन, मासिक चाचणी, असाइनमेंट, आकर्षक वर्ग सजावट, विद्यार्थी अपघात फंड, आनंददायी शनिवारच्या माध्यमातून कृतीयुक्त अध्यापन असे अनेकविध उपक्रम विद्यालयात राबविले जातात. क्रीडा, सांस्कृतिक विविध स्पर्धा परीक्षांमध्ये तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर विद्यार्थ्यांनी केलेल्या नेत्र दीपक यशाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने विद्यालयास उपक्रमशील शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान संस्थेचे सचिव अजित वडगावकर, प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, नारायण पिंगळे, उज्वला कडलासकर, सोनाली आवारी यांनी स्विकारला. हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर आणि सचिव अजित वडगावकर व सर्व संस्था पदाधिकारी यांनी प्रशासन, सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी - विद्यार्थिनी आणि पालकांचे अभिनंदन केले.

No comments: