SHRIMANT
- श्री संत ज्ञानोबा तुकोबा विश्वभ्रमण दिंडी सोहळा दुबई २०२२
- श्री विश्वशांती जगद्गुरू सेवा संस्था
- सूत्रसंचालन
- "भाषण कला शिका "
- ऑनलाईन बँक खाते
- भाषणासाठी विषय निवडताना
- वक्तृत्व कला
- सर्वांगीण दृष्टी
- संवाद तंत्र
- करीअर
- होमी मिनिस्टर LIVE
- विदेश दौरे
- मी श्रीमंत आहे live show
- सूत्रसंचालनासाठी उपयुक्त चारोळ्या
- पुस्तके का वाचावीत
- सूत्रसंचालन
- मीडिया
- कामगार पुरस्कार सोहळा
- LIVE मुलाखत
- तिरुपती बालाजी दर्शन
- मराठी देशा
- विवेकानंदांची अतिशय महत्त्वाचे वाक्ये
- चांगले विचार
- ई- Paper वर्तमानपत्रे
- उपयोगी छोट्या कथा
- निवडक बोधकथांचा एक संग्रह
- फक्त विनोद - Only Jokes
- वक्तृत्व
- योगासने
- वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Youtube
- News Blog
Tuesday, October 14, 2025
श्री ज्ञानेश्वर विद्यालयात सायबर क्राईम विषयावर जनजागृती कार्यशाळा
पुणे आळंदी-विद्यार्थी शिक्षकांमध्ये सायबर सुरक्षिततेची जागरूकता निर्माण
पिपरी चिंचवड पुलिस आयुक्तालय व श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने साइबर गुन्ह्यांबाबत जागृति कार्यक्रम आज शेठ कांतिलाल नंदराम चोरडिया सांस्कृतिक सभा गृहामध्ये आयोजित करण्यात आला. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी ऑनलाइन प्रास्ताविक केले व साइबर गुन्ह्याबद्दल माहिती देत कार्यक्रमाचा ऊद्देश सांगितला.
आजच्या डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर झपाट्याने वाढत असताना सायबर गुन्ह्यांचाही धोका वाढत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण मिळावे, तसेच जबाबदारीने तंत्रज्ञानाचा वापर करावा या उद्देशाने श्री ज्ञानेश्वर विद्यालयात “सायबर क्राईम विषयावर जनजागृती कार्यशाळेचे” आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेला प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपनिरीक्षक नरके साहेब उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांचे प्रकार, ऑनलाइन फसवणूक, बनावट ओळखपत्रे, OTP व बँक फसवणूक, सोशल मीडियावरची गोपनीयता, पासवर्ड सुरक्षा, फिशिंग आणि ट्रोलिंग, डिजिटल अँरेस्ट याविषयी सोप्या उदाहरणांसह माहिती दिली.
तसेच “अज्ञात लिंकवर क्लिक करू नका, वैयक्तिक माहिती शेअर करू नका, आणि संशयास्पद संदेश मिळाल्यास लगेच तक्रार करा” असा इशाराही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. अनेक विद्यार्थ्यांनी सायबर गुन्ह्यांबाबत प्रश्न विचारले, त्यांची योग्य उत्तरे व मार्गदर्शन अतिथींकडून मिळाले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेचे सचिव अजित वडगावकर, भाजप पश्चिम महाराष्ट्र आध्यात्मिक आघाडीचे संजय घुंडरे, पोलीस कर्मचारी मच्छिंद्र शेंडे साहेब, प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, उपप्राचार्य किसन राठोड, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, अनुजायीनी राजहंस आदी उपस्थित होते.
अजित वडगावकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “तंत्रज्ञान हे आशीर्वाद आहे, पण त्याचा अतिरेक व गैरवापर हानिकारक ठरू शकतो. सायबर सजगता ही काळाची गरज आहे. त्यामुळे योग्य तेवढाच वापर करून सायबर धोके टाळावीत."
शेवटी विद्यार्थ्यांनी या उपयुक्त कार्यशाळेबद्दल समाधान व्यक्त करत, सायबर सुरक्षिततेबाबत जागरूक राहण्याची शपथ घेतली.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment