SHRIMANT

Tuesday, October 14, 2025

आळंदीतील मोकाट कुत्रे यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील आळंदी नगरपरिषद हद्दीतील तसेच प्रभाग क्रमांक नऊ सह परिसरातील मोकाट कुत्रे यांचा मोठा त्रास होत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी माजी नगरसेवक दिनेश घुले यांनी केली आहे.
या संदर्भात आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांना घुले यांनी निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले आहे. आळंदी नगरपरिषद प्रभाग क्रमांक ९ मधील हिंदवी कॉलनी १, २, वाघजाई मंदिर परिसर, दगड़े बिल्डिंग परिसर तसेच चावडी चौक गावठाण येथील भागात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्रे यांची संख्या वाढली आहे. या मुळे परिसरात ये जा करणे धोक्याचे झाल्याने भीतीचे वातावरण आहे. लहान मुले, महिला, वृद्ध नागरिक यांना रहदारी करणे गैरसोयीचे झाले आहे. यामुळे आळंदी नगरपरिषदेने तात्काळ या भागातील मोकाट कुत्रे यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. तात्काळ कार्यवाही होऊन परिसर मोकाट कुत्रे भय मुक्त व्हावा. या साठी प्राधान्याने प्रशासनाने प्रयत्न करावेत अशी मागणी नागरिकांचे वतीने घुले यांनी केली आहे.

No comments: