SHRIMANT

Tuesday, November 4, 2025

*घुमान सायकलवारीचे श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत स्वागत

आळंदी पुणे - श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये वारकरी सांप्रदायाच्या संत साहित्याचे प्रचारक, प्रसारक नामदेव महाराज यांच्या पादुकांचे, वारकरी, सायकल स्वारांचे ढोल, ताशे, टाळ मृदंग व पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी वारीचे संयोजक भिसे, मनोज मांढरे, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर, सचिव अजित वडगांवकर, संस्था सदस्य विलास सोपान कुऱ्हाडे, पत्रकार विठ्ठल शिंदे, मुख्याध्यापक प्रदीप काळे, शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, संत नामदेव, गुरुनानक यांच्या प्रतिमेचे व संत नामदेवांच्या पादुकांचे पूजन सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. वारीचे संयोजक मनोज मांढरे यांचा सन्मान संस्थेच्या वतीने सुरेश वडगांवकर यांच्या हस्ते करण्यात आला.अजित वडगांवकर यांनी सर्व सायकल स्वार, वारकरी यांचे स्वागत केले, आषाढीवारी प्रमाणे ही वारी गेले चार वर्षे पंढरपूर पासून घुमानमध्ये जाते, असे सांगत हैबतबाबांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा आषाढी पालखी सोहळा चालू केला तेव्हा परिस्थिती प्रतिकूल होती व सहभागी वारकऱ्यांची संख्याही कमी होती.परंतू आज सोहळ्यांचे वाढलेले वैभव आपण पाहतो."इवलेसे रोप लावियेले द्वारी | तयाचा वेलू गेला गगनावरी ||"या ऊक्ती प्रमाणे ही घुमान वारी पूढे स्वरूप धारण करो अशी माऊलींकडे
प्रार्थना करीत या वारीसाठी शुभेच्छा दिल्या. सालाबाद प्रमाणे पुढील वर्षीही ही वारी संस्थेच्या प्रांगणात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. वारीचे संयोजक, आयोजक यांनी संस्थेच्या प्रांगणामध्ये वारीचा रथ व पादुका आणल्याबद्दल आभार मानले. मनोज मांढरे यांनी श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान या संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पुढील अनेक राज्यातून जाणाऱ्या वारीसाठी शुभेच्छा दिल्याबद्दल व सन्मान केल्याबद्दल आभार व्यक्त केले. सतीश जाधव यांनी विद्यार्थ्यांनी सायकल चालवावी, प्रदूषण मुक्त जीवन जगावे. तसेच पुढील वर्षापासून तुमच्या पालकांना आरोग्यदायी सायकलवारीमध्ये सहभागी होण्यासाठी आव्हान करा असे सांगितले. कार्यक्रमाचे नियोजन राहुल चव्हाण व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

No comments: