SHRIMANT

Tuesday, November 18, 2025

स्व.भरत साहेब सदार यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप

(खडकी सदार )येथील संत ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ यांचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय भरत साहेब सदार . यांच्या ७ व्या पुण्यस्मरना निमित्त पुण्यतिथीचा कार्यक्रम श्री जाधव सर (मुख्याध्यापक) यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 18 नोव्हेंबर मंगळवार रोजी ठेवण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ स्वातीताई सदार (अध्यक्षा संत ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ खडकी सदार )प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर ज्ञानेश्वर पाटील सदर तसेच प्रमुख उपस्थिती मध्ये श्री संजू भाऊ सदार ( उपाध्यक्ष संत ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ खडकी सदार) व श्री संदीप भाऊ सदार (सचिव संत ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ खडकी सदार) तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते स्व.भरत साहेब सदार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये पाटी लेखन हा उपक्रम राबविण्यात आला विद्यार्थ्यांना रोजचा अभ्यास पाटीवर कसा करायचा गणित ,इंग्रजी ,विज्ञान, या सारख्या अवघड विषयाच्या संकल्पना पाटीवर लिहून त्याचा सराव करायचा; अशाप्रकारे डॉ. ज्ञानेश्वर पाटील सदार यांनी उपक्रमाचे महत्त्व समजून सांगितले. कार्यक्रमाच्याअध्यक्षा सौ. स्वातीताई सदार यांनी विद्यार्थ्यांना स्व.भरत साहेबांच्या जीवन संघर्षाची संपूर्ण माहिती दिली. कोणत्या परिस्थितीत त्यांनी ही शाळा उभारली व चालवली. त्यांना कशा अडचणी आल्या याविषयी विद्यार्थ्यांना सांगितले. अशाप्रकारे आमच्या विद्यालया मध्ये स्व.
साहेब सदार आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री वाठोरे सर, तसेच आभार प्रदर्शन श्री बकाल सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री वायाळ सर, श्री फुकाटे सर, श्री माधव खडसे, श्री माधव मार्कड व श्री मंगेश कोरडे यांनी परिश्रम घेतले.

No comments: