SHRIMANT

Thursday, November 20, 2025

श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना 'आयडियल स्टडी ऍप' मोफत वाटप

पुणे आळंदी - रोटरी क्लब ऑफ इंदापूर यांच्यावतीने आळंदीतील श्री ज्ञानेश्वर विद्यालय व जुनिअर कॉलेज मधील इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना *' आयडियल स्टडी'* या अभ्यासक्रमावरील मोबाईल ॲप चे मोफत वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष रो. मा. श्री. नरेंद्रशेठ गांधी
(असिस्टंट गव्हर्नर रोटरी क्लब इंदापूर, पुणे),रो. मा. श्री. निखिल शहा (अध्यक्ष रोटरी क्लब इंदापूर) यांच्या शुभहस्ते आणि रो. मा. श्री. धरमचंद लोढा (अध्यक्ष भारतीय जैन संघ इंदापूर) व रो. मा. श्री. बाळासाहेब क्षीरसागर. मा . श्री. संदीपभाऊ भाबड (अध्यक्ष लोकशिक्षण संस्था सिन्नर) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सचिव अजित वडगावकर यांनी प्रस्ताविकामध्ये संस्थेच्या आणि रोटरी क्लबच्या कार्याची माहिती दिली. तसेच विद्यार्थी हितासाठी सर्वांनी संस्थेला सहकार्य करण्याचे आवाहन केले . संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर यांनी विद्यार्थ्यांना पुरवलेल्या ऍप बद्दल रोटरी क्लबचे आभार मानले. रो. मा. श्री. नरेंद्रशेठ गांधी यांनी सांगीतले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत यश प्राप्तीसाठी या 'आयडियल स्टडी ऍप' निर्मिती केली आहे आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून सुमारे एक लाख विद्यार्थ्यांना या ऍपचे मोफत वाटप केले आहे. विद्यार्थ्यांनी या ॲप चा वापर करून दहावी परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन करावे असे आवाहन केले. याप्रसंगी धरमचंद लोढा (भारतीय जैन संघ इंदापूर), नितीन शहा (रोटरी क्लब इंदापूर) आणि संदीप भाबड (अध्यक्ष- लोकशिक्षण संस्था सिन्नर) यांनी मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमांमध्ये लोकशिक्षण संस्था, सिन्नर यांच्या वतीने श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या विश्वस्त मंडळातून अध्यक्षपदी फेरनिवडीसाठी सुरेश वडगावकर आणि सर्व विश्वस्त ,कार्यकारणी सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, विश्वस्त एल.जी. घुंडरे, मुख्याध्यापक सूर्यकांत मुंगसे, उप मुख्याध्यापक किसन राठोड, प्रशांत सोनवणे, संस्था सदस्य अनिल वडगावकर, राहुल घुंडरे प्रदीप काळे, इयत्ता दहावीचे सर्व वर्गशिक्षक, सौ कदम एस. आर,श्रीम.जगताप मॅडम ऊपस्थित होते. सूत्रसंचालन सूर्यकांत खुडे व आभार सूर्यकांत मुंगसे यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमांचा समारोप झाला.

No comments: