SHRIMANT

Sunday, November 30, 2025

विचारांच्या प्रगल्भतेमुळे आळंदी हे येत्या शतकात होणार विश्वाचे केंद्र- स्वामी गोविंददेव गिरीजी

पुणे आळंदी - गीता जयंतीचे औचित्य साधून वेदश्री तपोवन येथे 22 नोव्हें ते 27 नोव्हें 2025 या कालावधीत शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. स्पर्धेत सहभागी झालेल्या तीन हजार विद्यार्थ्यांमधून बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव वेदश्री तपोवनच्या पावन भूमीत श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी आणि हभप डॉ. नारायण महाराज जाधव यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
जीवन आणि संस्कृतीचे सार भगवद्गीता आहे आणि भगवद्गीता हा वेदांचा छोटा अवतार आणि सोपे रूप आहे. या भगवद्गीतेचे वाचन आणि श्रवण आळंदीच्या भूमीमध्ये होते. वैश्विक विचार माऊलींच्या साहित्यात आणि जीवनात आढळतात. विचारांच्या या प्रगल्भतेमुळे आळंदी हे येत्या शतकात विश्वाचे केंद्र होणार असा विश्वास स्वामीजींनी आपल्या मनोगतात व्यक्त केला. विद्यार्थ्यांना योगा, सूर्यनमस्कार आणि गीता पाठांतराच्या माध्यमातून आपल्या संस्काराने संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याचा संदेश दिला. या जिल्हास्तरीय स्पर्धेत श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले. लाठी काठी स्पर्धा प्रथम आरोही लक्ष्मण तांदळे (मोठा गट) द्वितीय - संचिता डामरे (छोटा गट) उत्तेजनार्थ गौराई ठोंबरे (मोठा गट) वक्तृत्व स्पर्धा द्वितीय - ज्ञानेश्वरी ढगे (मोठा गट) श्रीमद्भगवद्गीता पाठांतर स्पर्धा तृतीय- गायत्री इतिराज लोहोर (मोठा गट) निबंध स्पर्धा उत्तेजनार्थ - सिद्धी सतीश थोरबोले या विद्यार्थ्यांना अनुक्रमे पाच हजार, तीन हजार, दोन हजार व एक हजार रुपयांची बक्षीस देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक,.प्रकल्प समन्वयिका सौ उज्वला कडलासकर मार्गदर्शक शिक्षक श्री नारायण पिंगळे, श्री प्रमोद कुलकर्णी, सौ सोनाली आवारी ,श्री रामदास वहिले, सौ सोळंके मॅडम, श्रीम.भारती तायडे ,सौ प्रियंका भुजबळ यांचे व विद्यार्थी पालकांचे कौतुक करून अभिनंदन केले.

No comments: