SHRIMANT

Friday, January 16, 2026

धानोरे येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेत सदिच्छा समारंभाचे आयोजन

धानोरे (ता. खेड) येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेत बदली झालेल्या शिक्षकांच्या सन्मानार्थ कृतज्ञता व सदिच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
शाळेच्या जडणघडणीत, गुणवत्तावाढीत व शैक्षणिक यशप्राप्तीत मोलाचे योगदान देत शाळेला गुणवत्तेच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचविण्यासाठी ज्या शिक्षकांनी तन-मन-धन अर्पण करून निष्ठेने सेवा बजावली, अशा बदली झालेल्या सर्व शिक्षकांचा या समारंभात गौरव करण्यात येणार आहे. हा सदिच्छा समारंभ शनिवार, दि. 17 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास सर्व पालकांनी व ग्रामस्थांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याध्यापक व शिक्षकवृंद, जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, धानोरे यांनी केले आहे.

No comments: