SHRIMANT
- श्री संत ज्ञानोबा तुकोबा विश्वभ्रमण दिंडी सोहळा दुबई २०२२
- श्री विश्वशांती जगद्गुरू सेवा संस्था
- सूत्रसंचालन
- "भाषण कला शिका "
- ऑनलाईन बँक खाते
- भाषणासाठी विषय निवडताना
- वक्तृत्व कला
- सर्वांगीण दृष्टी
- संवाद तंत्र
- करीअर
- होमी मिनिस्टर LIVE
- विदेश दौरे
- मी श्रीमंत आहे live show
- सूत्रसंचालनासाठी उपयुक्त चारोळ्या
- पुस्तके का वाचावीत
- सूत्रसंचालन
- मीडिया
- कामगार पुरस्कार सोहळा
- LIVE मुलाखत
- तिरुपती बालाजी दर्शन
- मराठी देशा
- विवेकानंदांची अतिशय महत्त्वाचे वाक्ये
- चांगले विचार
- ई- Paper वर्तमानपत्रे
- उपयोगी छोट्या कथा
- निवडक बोधकथांचा एक संग्रह
- फक्त विनोद - Only Jokes
- वक्तृत्व
- योगासने
- वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Youtube
- News Blog
Sunday, May 3, 2026
वारकरी संप्रदायातील पहिलेच बालसाहित्याचे दिमाखात प्रकाशन; 'माऊलींची गोष्ट'
देहू: वारकरी संप्रदायाची तेजस्वी परंपरा आणि संत विचार नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशाने 'यु.एस.ओ. वारकरी' (USO Warkari) निर्मित 'माऊलींची गोष्ट' या विशेष बालसाहित्य पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज महाराष्ट्र दिनानिमित्ताने श्रीक्षेत्र देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थानमध्ये उत्साहात पार पडला. ह.भ.प. अनिकेत महाराज मोरे देहूकर , पूनम खंडागळे आणि इंग्रजी भाषेत कल्याणी पांडे यांनी या पुस्तकाचे लेखन केले असून, अनिषा शिंदे, किरण बोडा, प्रतीक्षा मोरे आणि वेदांत राजे यांनी या पुस्तकासाठी आकर्षक रेखाटने साकारली आहेत.
या पुस्तकाचे प्रकाशन ह.भ.प. प्रभू महाराज माळी (सचिव, संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, अरण) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी मनोगत व्यक्त करताना महाराज म्हणाले की, "वारकरी संप्रदायातील हे पहिलेच बालसाहित्य प्रकाशित होत असल्याचा सार्थ अभिमान वाटतो. यु.एस.ओ. वारकरीच्या माध्यमातून सर्व संतांचे साहित्य बालकांसाठी उपलब्ध करून दिले जात आहे, ही अभिनंदनीय बाब असून हे पुस्तक घराघरांत आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे."
संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त ह.भ.प. उमेश महाराज मोरे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, "या पुस्तकामुळे बालसाहित्यात खऱ्या अर्थाने एक मोलाची भर पडली आहे. लहान मुलांना संत ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र समजून घेण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरेल." देहू नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा सौ. प्रियांका मोरे यांनी यावेळी आवाहन केले की, "बालकांवर सुसंस्कार करणारी अशी पुस्तके सर्वत्र पोहोचली पाहिजेत, ज्यामुळे मुलांमध्ये वाचनाची आवडदेखील निर्माण होईल."
कार्यक्रमाचे विशेष अतिथी आणि अभंग स्कूलचे प्रमुख मा. विकास कंद यांनी आपले विचार मांडले. ते म्हणाले, "वारकरी संतांचे ओवी आणि अभंग स्वरूपातील गहन तत्त्वज्ञान आजच्या बालकांसाठी यु.एस.ओ. वारकरीच्या माध्यमातून अत्यंत सोप्या आणि रसाळ मराठी भाषेत उपलब्ध करून दिले आहे. यामुळे मुलांना आपली संस्कृती समजणे सुलभ होईल."
या पुस्तकाचे लेखक अनिकेत महाराज मोरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले “आज महाराष्ट्र दिनानिमित्त मराठी भाषेमध्ये आणखी नवीन मराठी बालसाहित्याची भर पडली याचा अत्यंत आनंद आमच्या यु.एस.ओ. वारकरी टीमला होत आहे. या पुस्तकाचा आपण सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा.”
या सोहळ्याला संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त ह.भ.प. वैभव महाराज मोरे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मोरे, तसेच मा. सचिन कुंभार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. देहू नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. पुजा दिवटे, माजी नगराध्यक्षा स्मिता चव्हाण यांनीही या ऐतिहासिक उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
मराठी, इंग्रजी आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये उपलब्ध असलेले हे साहित्य मुलांसाठी 'संस्कारांची खाण' ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. या उपक्रमाची अधिक माहिती www.usowarkari.org या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment